निळू फुले पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर !

मुंबई प्रतिनिधी | दिग्गज अभिनेते तथा सामाजिक कार्यकर्ते निळू फुले पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहेत, त्यांच्यावरील बायोपीकचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून याकडे आता सर्व रसिकांचे लक्ष लागले आहे.

रूपेरी पडद्यावरील अनेक बायोपीक म्हणजेच चरित्रपट गाजत असतात. यात आता अजून एका नवीन चरित्रपटाची भर पडणार आहे. मराठी सिनेमासृष्टीतील एक दिग्गज तसेच मराठी-हिंदी चित्रपट, रंगभूमीवरील एक अष्टपैलू अभिनेता दिवंगत निळू फुले यांचा जीवनपट आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. निर्माता कुमार तौरानी यांनी निळू फुले  यांच्यावर चित्रपट निर्मिती करण्याची तयारी सुरू केली आहे. निळू फुले यांची मुलगी अभिनेत्री गार्गी फुले यांच्याकडून या बायोपिकसाठीचे हक्कही विकत घेतले असून लवकरच त्याच्या चित्रीकरणास प्रारंभ होणार आहे.

निळू फुले यांच्यावरील चरित्रपट हिंदीत तयार करण्यात येत असून यात त्यांच्या रूपरी पडद्यावरील कारकिर्दीसोबतच सामाजिक कार्यातील त्यांच्या भरीव कामगिरीला देखील प्राधान्य देण्यात येणार आहे. अद्याप या चित्रपटात निळू फुले यांची भूमिका कोण साकारणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. तसेच इतर कालाकरांच्या निवडी देखील व्हायच्या आहेत. हिंदीमध्ये या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. त्याच बरोबर हा चित्रपट मराठी येईल की नाही याबाबत कौरानी यांनी अद्याप माहिती दिलेली नाही.

निळू फुले यांना बॉलिवूडमध्येक्ष मोठे स्थान होते. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यामुळे या चित्रपटाला संपूर्ण भारतात चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. २५० हुन अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटात निळू फुलेंनी अभिनय केला होता. निळु फुलेंनी त्यांच्या कारकिर्दीची सुरवात मराठी नाटक अकलेच्या कांद्याची गोष्ट पासून केली होती. तर एक गाव बारा भानगडीफपासून त्यांच्या चित्रपटातून कारकिर्दीची सुरवात केली होती.  त्यांच्या खलनायकी भूमिका विशेष गाजल्या. २००९ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते.

 

Protected Content