स्व.रंजनसिंग राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | टायगर गृपचे पदाधिकारी रंजनसिंग राजपूत हे हयात असतांना प्रत्येक वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेत असत. त्यांचा हा वारसा निरंतर सुरु राहावा यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

टायगर गृपचे पदाधिकारी रंजनसिंग राजपूत यांचे तीन महिन्याअगोदर दुर्धर आजाराने दुःखद निधन झाले. ते हयात असतांना प्रत्येक वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेत असत. त्यांचा हा वारसा निरंतर सुरु राहावा यासाठी त्यांचे मोठे बंधू अजय पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

यावेळी ८८ दात्यांनी रक्तदान केले. तसेच शहरातील आत्मसन्मान फाउंडेशन मध्ये अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी फोनद्वारे आमदार चंद्रकांत पाटील, रोहिणी खेवलकर, टायगर गृपचे अध्यक्ष तानाजी जाधव, राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे यांनी संवाद साधला. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, नगराध्यक्ष आनंदा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके, हितेश पाटील,  सागर सपके, गौरव ऊमाप यांनी भेट दिली.

यावेळी संदिप मिलांदे, अजय पाटील, रोहित छपरीबन, राजू सोनवणे, कालू गायकवाड, अप्पू सारवान,  भैय्या देशमुख, विलास माळी, राहुल शर्मा, हर्षल चौधरी, विनोद सोनार,  अमोल व्यवहारे, गजू राणा, मनोज राजपूत, अक्षय माळी, अक्षय गंगातीरे, विजय डोखे,  विकास पाटील यांच्यासहित अन्य जण उपस्थित होते. कार्यक्रमाला रेड प्लस ब्लड बँकेचे डॉ.जी.आर.भोळे, अमोल शेलार, निलेश गोंधडे,  दिपक पाटील,  प्रमोद पाटील,  सलमान पटेल आदी कर्मचारी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!