जळगाव प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयात एन.सी.सी. आणि एन.एस.एस. यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ९ ते २ वाजेदरम्यान ह्युमेनीटी बिल्डींग येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिकांनी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करून ८४ विद्यार्थ्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व निभावले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन १८ महाराष्ट्र बटालिअन चे समादेशक कर्नल प्रविण धिमान यांच्या हस्ते झाले. यावेळी वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रा. डॉ. ए.पी. सरोदे, प्रा. डॉ. के.जी. खडसे, एन.सी.सी चे प्रमुख लेफ्ट.डॉ. योगेश बोरसे, एन.एस.एस. चे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलवरसिंग वसावे, प्रा. आर्सिवाला, सिटीओ गोविंद पवार, प्रा.डॉ. विशाल देशमुख आणि प्रा. डॉ. नम्रता महाजन तसेच सुभेदार मेजर कोमल सिंग, सुभेदार जयपाल उपस्थित होते.
सिव्हील हॉस्पिटल च्या रक्त पेढीचे डॉ. रागीब, जन संपर्क अधिकारी निलेश पवार आणि सहकारी यांनी रक्तदान मोहिमेत योग्य ती काळजी घेऊन शिबीर संपन्न केले. विशेष म्हणजे या शिबिरासाठी एच.डी.एफ.सी. बँकेद्वारे रक्त दात्यांना पेन, चहा, केली देऊन सहयोग केले. बँकेचे अधिकारी तुषार वडोदकर उपस्थित होते.