‘त्या’ लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुन्ह्यात मदत करण्यासाठी १ लाख रूपयांची लाच घेणाऱ्या मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाला गुरूवारी अटक केली होती. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

या संदर्भात असे की, तक्रारदार यांच्याविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात २९ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील कागदपत्रांमध्ये मदत करून चार्जशिट लवकरात लवकर पाठवून गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश जनन्नाथ ढिकले (वय-३२) रा.जिजाई नगर, तिरपुळे रोड, मेहुणबारे ता. चाळीसगाव यांनी ४ लाख ५० हजाराची मागणी केली होती. तडजोडी अंती १ लाख रूपये देण्याचे ठरविले होते. दरम्यान, तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार खात्री करण्यासाठी लाचलुचपत विभागाने गुरूवार २ जून रोजी सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले याने १ लाख रूपयांची रक्कम घेतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

संशयित आरोपी योगेश ढिकले याला जळगाव न्यायालयाचे न्यायाधिश डी.एन.खडके यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके काम करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!