जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधाी । भारतीय जनता पार्टीचा ४२ वा वर्धापन दिनानिमित्त भाजपा कार्यालयात आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन आणि पक्ष ध्वजारोहण करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचा आज ४२ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात भाजपा महानगरतर्फे साजरा करण्यात आला. बळीराम पेठ येथील भाजपा जिल्हा कार्यालयात सकाळी ९ वाजता आमदार सुरेश भोळे व महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन व पक्ष ध्वजारोहण केले. त्यानंतर कार्यालयात सत्यणारायणची महापुजा युवा मोर्चा कार्यकर्ते निखिल सुर्यवंशी यांनी सहपत्नीक केली.
याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, सेवा, समर्पण, व त्याग म्हणजे भारतीय जनता पार्टी असुन जगात एक नंबरचा पक्ष आज आपल्या सर्व सामान्य कार्यकर्तामुळे होऊ शकला आहे, असे सांगितले. तर जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी सांगितले कि, वर्धापन दिनाच्या माध्यमातून ६ एप्रिल ते १६ एप्रिल पर्यंत संपूर्ण सप्ताहभर पक्षाचाच्या माध्यमातून समाजिक समरस्ता म्हणुन भाजपा पार्टी महानगरातील नऊ मंडलामध्ये साजरा करण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले व शुभेच्छा दिल्या.
भाजपा कार्यालय येथे महिला आघाडी तर्फे सुंदर रांगोळ्यांनी काढण्यात आले होते, तसेच कार्यलयाला भव्य रोशनाईने व सजवण्यात आले आहे. जळगाव महानगरात कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरावर व चौकात पक्षाच्या ध्वज लावल्यामुळे पूर्ण शहर भाजपामय झाले आहे. या प्रसंगी शक्ति केंद प्रमुखांना नावांच्या फलक प्रदान करण्यात आल्या. तसेच महानगरातर्फे वाहनांना पक्षाचे चिन्हाचे स्टीकर लावून अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस महेश जोशी यांनी केले. यावेळी सर्व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शुभेच्छा व एकमेकांना लाडू भरविले. सदर कार्यक्रमला जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, नगरसेवक, आघाडीचे अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.