Home Cities जळगाव केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात कॉंग्रेसची ट्रॅक्टर रॅली

केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात कॉंग्रेसची ट्रॅक्टर रॅली

0
31


 

जळगाव, प्रतिनिधी । उद्या सोमवार ९ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा कॉंग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅलीकाढून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधात काळे कायदे संमत केले. त्याविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार या कायद्याच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेऊन जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली सोमवार ९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता कॉंग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत काढण्यात येणार आहे. या रॅलीचे नेतृत्व कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आ. शिरीष चौधरी, प्रदेश चिटणीस डी. जी. पाटील करणार आहेत. रॅलीत सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येन सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी केले आहे.


Protected Content

Play sound