भुसावळ, राजकीय

भुसावळातून होणार भाजपच्या प्रचार मोहिमेस प्रारंभ

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । येथे खासदार रक्षाताई खडसे यांच्या कामांचा लेखाजोखा प्रसिध्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असून या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासच एका अर्थाने सुरूवात होणार आहे.

माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर सक्रीय झाले आहेत. विशेष बाब म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींशी त्यांचा सूर जुळल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच भाजपच्या मेळाव्यातील त्यांची देहबोली ही आक्रमक आणि सकारात्मक असल्याचे दिसून आले. या पार्श्‍वभूमिवर, आता ते भुसावळातून आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे यांच्या कार्यकाळाचील अहवाल प्रकाशित होणार असून याचप्रसंगी भुसावळातील विकासकामांचे उदघाटनदेखील करण्यात येणार आहे. याबाबत एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

आपल्याला हे देखील आवडू शकते !


शेअर करा !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*