यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । साकळी-किनगाव मंडळ (यावल-पश्चिम) भारतीय जनता पक्षाच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त भवानी माता मंगल कार्यालय, साकळी येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला असून नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सुनील पाटील (भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेत (UNO) दिलेल्या ऐतिहासिक भाषणाचा उल्लेख करत योग दिनाच्या जागतिक स्वीकाराचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. त्यांनी भारतातील ऋषीमुनींच्या योग परंपरेचा गौरव करत योगाचे मन व शरीर यांच्यातील समन्वय टिकवण्याचे महत्व विशद केले.
योग शिक्षक रामकृष्ण खेवलकर (साकळी) यांनी उपस्थितांना विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली आणि त्यांच्याकडून ती करून घेतली. त्यांनी प्रत्येक आसनाचे शारीरिक व मानसिक फायदे सोप्या भाषेत समजावून सांगितले.
या योग शिबिरात भाजपाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला. मंडळ अध्यक्ष अनिल पाटील (किनगाव), जिल्हा परिषदचे माजी शिक्षण समिती सभापती रविंद्र पाटील, प्रभाकर सोनवणे, उज्जैनसिंग राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील, कृऊबास संचालक सुनील नेवे, विकासो चेअरमन विलास काळे, तेजस पाटील, सूर्यभान बडगुजर, राजेंद्र नेवे, नितीन फन्नाटे, योगेश खेवलकर, मयूर पाटील (दहिगाव), अजय पाटील (पिळोदा), विशाल पाटील, विकी सोनवणे, ज्ञानेश्वर सोनार, विशाल वाघळे, नितीन महाजन, विनोद खेवलकर (ग्रा. पं. सदस्य), आकाश पाटील, गिरीष प्रजापती आदी मान्यवर उपस्थित होते.