जळगाव, प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाने आज आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून त्यानुसार जिल्ह्यातील सहा विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे भाजपच्या पहिली यादीत ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाजपाच्या पहिल्या यादीत जळगाव शहर – सुरेश भोळे, रावेर – हरीभाऊ जावळे, अमळनेर – शिरीष चौधरी, चाळीसगाव – मंगेश रमेश चव्हाण, जामनेर – गिरीश महाजन, भुसावळ – संजय सावकारे यांचा समावेश आहे.