भाजप नेत्यांनीच आणले अनेकदा ‘प्रपोजल’- शरद पवारांचा दावा

मुंबई प्रतिनिधी । भाजप बरोबर सत्ता स्थापनेसाठी आम्ही कधीच चर्चा केली नाही. भाजप नेतेच अनेकदा ‘प्रपोजल’ घेऊन आमच्याकडे आले असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या तिसर्‍या भागात त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीचा तिसरा भाग आज प्रकाशित करण्यात आला आहे. यात शरद पवार यांनी अनेक प्रश्‍नांना मनमोकळी उत्तरे दिली आहेत. ते म्हणाले की, विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर करणे हेच ऑपरेशन कमळ आहे. याचा अर्थ लोकांनी निवडलेले सरकार दुबळी करणे, डिस्टॅब करणे त्यासाठी केंद्रातील सत्तेचा गैरवापर करणे हा आहे परंतु महाराष्ट्रात हे चालणार नाही. शिवसेनेने भाजप सोबत जाऊ नये, ही आपली पहिल्यापासून इच्छा होती. त्यामुळे आम्ही भाजप सरकारला बाहेरुन पाठिंबा देऊ, असे जाणीवपूर्वक वक्तव्य केले. शिवसेनेला भाजपपासून दूर करण्यासाठी हे वक्तव्य होते, असे पवार यांनी सांगितले. (sharad pawar interview)

दरम्यान, २००४ मध्ये राष्ट्रवादी भाजप बरोबर सरकार बनवणार होते, हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाबाबात पवार म्हणाले, २००४ मध्ये डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये फडणवीस यांना काय स्थान होते? विरोधी पक्षातील जागृत आमदार म्हणून त्यांची ओळख होती. मुख्यमंत्री झाल्यावर लोकांना ते माहीत झाले. राज्याच्या किंवा देशाच्या नेतृत्वामध्ये बसून निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता, असे मला वाटत नाही. शिवसेनच्या सत्ता स्थापनेपासून आदेश देणे त्याचे पालन करणे अशीच प्रथा आहे. कांँग्रेस, राष्ट्रवादीत आम्ही वरिष्ठांच्या मतांचा आदर करतो. पण वरिष्ठांकडून आदेश येतोच, असे नाही. जर आदेश आला तरी आम्ही त्याच्यावर चर्चा करु शकतो. शिवसेनते एकादा नेतृत्वाने निर्णय घेतल्यावर त्या विचाराने चालायचे असते. सध्याच्या मुख्यमंत्र्यांची तिच पद्धत आहे.

या मुलाखतीत शरद पवार पुढे म्हणाले की, विरोधी पक्षनेता जर आज असे म्हणत असेल की मी मुख्यमंत्री असताना माझे मुख्यमंत्रीपद गेले. त्यासंबंधीचे सत्त्य पचवायला मला वेळ लागला. म्हणजे सत्तेशिवाय मी चालू शकतो की नाही, असे ते सांगत आहे. विरोधी पक्ष नेत्याने आता स्वीकारले पाहिजे की, सत्ता आपला रस्ता नाही. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल आणि पुढची निवडणूक आम्ही एकत्र लढवू असा दावा देखील शरद पवार यांनी या मुलाखतीत केला.

Protected Content