मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द आम्ही पाळला असून केंद्राने राज्य सरकारला सर्वात जास्त मदत केली असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना केले आहे.
यावेळी त्यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. केंद्र सरकारने सोळा लाखांपैकी चार लाख 35 हजार रेमडेसीविर इंजेक्शनचा कोटा महाराष्ट्राला दिला आहे. तसेच 1100 व्हेंटिलेटर्सही दिले आहेत. मात्र, या मदतीनंतर मुख्यमंत्री वगळता एकाही महाविकासआघाडीच्या नेत्याने केंद्र सरकारचे आभार मानले नाहीत, अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
सर्व नागरिकांना लस मोफत देणार, ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात स्पष्ट केली आहे. यासंदर्भात महाविकासआघाडी मध्ये एकवाक्यता असली पाहिजे. मात्र, एखाद्या राज्याला वाटले की त्यांना मोठ्या संख्येने लसीकरण करायचे आहे तर त्यांना बाजारामध्ये लस उपलब्ध आहे. खासगी आस्थापनांना वाटलं स्वतःचा पैसा खर्च करून लसीकरण करायचे आहे तर ते करू शकतात.
मात्र, आता महाविकासआघाडीच्या मंत्र्यांकडून वेगवेगळी वक्तव्य का केली जात आहेत? आदित्य ठाकरे यांनी ट्विट डिलीट का केले, यावर मला बोलायचे नाही. 1 तारखेपासून आपल्याला लसीकरणाची पद्धत बदलायला हवी. कारण आता मोठ्या संख्येने लोक यात सामील होणार आहेत. त्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे. गर्दी होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने त्यासाठी धोरण आखायला हवे, असे फडणवीस यांनी सांगितले.
‘महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही’