कानळदा रोडवरील जुगार अड्ड्यावर शनीपेठ पोलीसांचा छापा; आठ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ममुराबाद रोडवर झन्ना मन्ना जुगाराच्या अड्ड्यावर शनीपेठ पोलीसांनी रविवारी सायंकाळी छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले असून २ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी आठ जणांविरूध्द शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील ममुराबाद रोडवरील तुळजाई बिल्डिंगसमोरली पडक्या जागेवर काही व्यक्ती झन्ना मन्नाचा खेळ खेळत असल्याची माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांना मिळाली. त्यानुसार पोउनि अमोल कवडे, पोहेकॉ रघुनाथ महाजन, अनिल कांबळे, गणेश गव्हाळे, अमित बाविस्कर, राहूल पाटील यांचे पथक तयार करून २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलीसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून दिपक हिरालाल गवळी (वय-२९) रा. गवळी वाडा, प्रमोद ताराचंद गवळी (वय-२८) रा.ममुराबाद रोड शनीपेठ, अशोक हिरालाल गवळी (वय-२६) रा. गवळी वाडा, मनोज गणेश गवळी (वय-३८) रा. कांचन नगर, राजू पापन्ना गवळी (वय-३४) रा. गवळीवाड,  राजेश सखाराम गवळी (वय-३०) रा. रिंधुरवाडा, मरीमाता मंदीर शनीपेठ, दिनेश नंदू गवळी (वय-३५) रा. दाळफळ शनिपेठ,  आणि रोजश उमाकांत जगतात (वय-४५) रा. शिवाजी नगर, हमाल वाडा यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील २ हजार ८०० रूपये आणि जुगार खेळण्याचे साहित्य पोलीसांनी हस्तगत केला आहे. पोकॉ राहूल पाटील यांच्या फिर्यादीवरून आठ जणांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनीपेठ पोलीस कर्मचारी करीत आहे. 

 

Protected Content