भुसावळ प्रतिनिधी | आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळातर्फे शहरातील वर्दळीच्या सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. आज हे सीसीटीव्ही कॅमेरे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे सुपूर्द केले जाणार आहेत. याशिवाय, भाजपा शहराध्यक्ष परिक्षीत बर्हाटे यांच्या निवासस्थानी म्युन्सीपल पार्कमध्ये नागरिकांना आरोग्य कार्डचे वाटप, सकाळी दहाला ट्रामा केअर सेंटरमध्ये भाजप वैद्यकीय आघाडीतर्फे रक्तदान शिबिर, हतनूरला आर.ओ.प्रणालीचे लोकार्पण, टिंबर मार्केटजवळील अंडरपासजवळ कॉंक्रिटीकरणाचे उद्घाटन, श्री नगर व विद्यानगराला जोडणार्या पुलाचे लोकार्पण, मोहीत नगरात डांबरीकरण, गजानन महाराज नगरात कॉंक्रिटीकरणाचा तसेच लहुलीला व वसुंधरा नगरात डांबरीकरणाचा शुभारंभ, मामाजी टॉकीज रोडवर ई-श्रम कार्ड व आरोग्य कार्ड, गमाडीया प्रेस रस्ता कामाचे भूमिपूजन तसेच काळा हनुमान मंदिराजवळ पेव्हर ब्लॉकच्या कामाचे उदघाटन करण्यात येणार आहे.
दरम्यान, आमदार संजय सावकारे हे वांजोळा रोडवरील स्टार लॉन, राजवाडा येथे आज सायंकाळी शुभेच्छांचा स्वीकार करतील. यावेळी आमदार मित्र मंडळातर्फे आमदारांचा सत्कारही करण्यात येणार आहे.