सातगाव शिवारात रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील शेतकरी शेतात काम करत असतांना अचानकपणे रानडुकराने हल्ला करून मांडीवर चावा घेवून जखमी केले आहे. 

सविस्तर माहिती अशी की, आबा तुळशीराम पाटील रा. सातगाव डोंगरी हे शेतकरी असून शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. २४ एप्रिल रोजी दुपारी आबा पाटील सातगाव शिवारातील आपल्या शेतात काम करत असतांना अचानक बामनी नदीतून धावत येऊन रानडुकराने त्यांच्यावर झडप घातली. रानडुकराने शेतकऱ्याच्या गुडघ्याच्या वर मांडीवर जोरदार चावा घेत शेतकरी जमिनीवर कोसळताच सुदैवाने डुकराने तेथून पळ काढला आणि पुढचा अनर्थ टळला.  नित्यनियमाप्रमाणे शेतकरी आबा पाटील आपल्या शेतात काम करत असतांना सकाळी नांगरलेल्या शेतातील दगड – गोटे नदीकाठाला फेकत होते. शेता शेजारी बामणी नदी असून याच नदीत झाडाझुडपात रान डुक्कर बसलेले असावे. दगड गोटे फेकण्याचा आवाज होताच रानडुकराने नदीतून वर चढून शेतकरी पाटील यांच्या वर्धक घातली आणि गुडघ्याच्या वर मांडला जोरदार चावा घेतला. चावा घेताच शेतकरी जमिनीवर कोसळला यावेळी डुक्कर  तसेच दुसऱ्याच्या शेतात निघून गेले शेतकऱ्यांचा नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी बालंबाल वाचला. सदर शेतकऱ्याने पाचोरा सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घेतले यावेळी वन विभागाचे कर्मचारी सुनील भिलावे उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्याने आर्थिक मदतीचीही मागणी केली आहे. रानडुकरांच्या भीतीने परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून, वन विभागाने सदर रानडुकरांना पकडावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या शेतात मान्सून पूर्व शेतीच्या कामांना वेग आला असून, तसेच महाभयंकर कोरोना आजारापासून बचाव व्हावा, म्हणून शेतकरी आपल्या मुलाबाळांसह शेतात मशागतीचे काम करतांना दिसतोय. मात्र शेतातही भीतीचे वातावरण शेतकऱ्यांसमोर आहेत. वनविभागाने याची दखल घ्यावी. अशी रास्त मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Protected Content