चाळीसगावात भाजपच्या बैठकीत विजय मिळवण्याचा केला निर्धार

bjp meeting

चाळीसगाव, प्रतिनिधी | भारतीय जनता पक्ष हा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्‍या परिश्रमामुळेच आज देशात सत्‍तेत आला आहे. अश्‍याच कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने यशाची गुढी उभारणार आहे, असे प्रतिपादन येथील विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना व मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार मंगेश चव्‍हाण यांनी येथे केले.

 

शुक्रवारी (दि.४) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात शक्‍ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुखांची एक नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी ते बोलत होते केले. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत उपस्थित सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केल्याने कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली असून कार्यकर्त्यांनी पक्षाला विजयी करण्याचा निर्धार केला आहे.

यावेळी व्‍यासपिठावर माजी केंद्रीय राज्य मंत्री एम.के.अण्णा पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष के.बी.साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, महिला आयोग सदस्या देवयानी ठाकरे, कृषी अनुसंधान परिषद सदस्य कैलास सुर्यवंशी, ज्येष्ठ नेते वसंतराव चंद्रात्रे, प्रितमदास रावलानी, राजेंद्र चौधरी, पं.समिती सभापती दिनेश बोरसे, रा.स.प. तालूका अध्यक्ष रवींद्र पाटील, मार्केट कमिटी सभापती रविंद्र चुडामण पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य धर्मराज रामा वाघ, न.पा. गटनेते संजय रतन पाटील, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राठोड, माजी जि.प. सदस्य शेषराव पाटील, डॉ.रमेश निकम, सतीश पाटे, भाऊसाहेब निकम, रोहन सुर्यवंशी, कपिल पाटील, नगरसेवक नानाभाऊ कुमावत, बाळासाहेब मोरे, चंद्रकांत तायडे, सोमसिंग राजपूत, निलेश राजपूत, भास्कर पाटील, विजयाताई पवार, चिरागुद्दिन शेख, बापू अहिरे, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, पियूष साळुंखे, मार्केट कमिटी सदस्य सरदार शेठ राजपूत, अनिल नागरे, प्रभाकर चौधरी, अरुण पाटील, धनंजय मंडोळे, राजेंद्र पगार, सुशील वानखेडे, विवेक चौधरी, पतींग पाटील आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

मंगेश चव्‍हाण पूढे म्‍हणाले की, पक्षाने आपल्‍यावर दाखवलेला विश्‍वास आपल्‍याला सर्वाच्‍या साथीने सार्थ ठरवायचा आहे. त्‍यामूळे प्रत्‍येकाने आपण स्‍वतः उमेदवार समजून काम करा. पक्षाच्‍या विकसनशील विचारांना सोबत घेवून तालूक्‍यात येणाऱ्या काळात विकासाची गंगा आणू. त्‍यासाठी आपल्‍या सर्वांची खंबीर साथ कायमस्‍वरूपी असू द्या, तुम्ही माझ्यासाठी नव्हे तर पक्षासाठी २० दिवस द्या, मी माझे आयुष्य आपल्याला साथ देण्यात खर्ची घालेन, असा विश्वास त्यांनी उपस्‍थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी एम.के. अण्णा पाटील, वसंत चंद्रात्रे, घृष्णेश्‍वर पाटील, दिनेश बोरसे, के.बी. साळुंखे, राजेंद्र चौधरी, सुनील निकम, भाऊसाहेब जगताप, देवयानी ठाकरे, प्रितमदास रावलानी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रा.सुनील निकम यांनी सुत्रसंचालन केले.

Protected Content