जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या आव्हानानुसार जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराजवळील निसर्गरम्य वातावरणात सोनबर्डी येथील सोमेश्वर मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी वेगवेगळे योगासन केले. यावेळी कार्यक्रमाला जामनेर शहराच्या लोकनियुक्त नगरसेविका साधना महाजन भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगर पालिका गटनेते डॉक्टर प्रशांत धोंडे, जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख, भाजपा शहराध्यक्ष अतिश झाल्टे यांच्यासह भाजपा नगरसेवक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने या योग दिन कार्यक्रमाला उपस्थित होते.