घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है ! : राऊतांचा शहांना टोला

मुंबई mumbai । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिंधुदुर्गातील कार्यक्रमात शिवसेनेवर घणाघाती टीका केल्यानंतर आज खासदार संजय राऊत यांनी त्यांना खास आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.

”बाळासाहेबांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत बुडवून शिवसेनेने सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गाने चालणार नाही. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती”, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले होते. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी ट्विट करत अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है, अशा शब्दांत संजय राऊत यांनी अमित शाह यांना टोला लगावला आहे.

तुफान ज्यादा हो तो,
कश्तियाँ डूब जाती है ।
और घमंड ज्यादा हो तो,
हस्तियाँ डूब जाती है ॥

असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

कालच संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावाल प्रत्युत्तर दिले होते. १९७५ मध्ये रजनी पटेल आणि ९० च्या दशकात कदाचित मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल असं भाकित केलं होतं. २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील त्याच गोष्टीचा पुनरूच्चार केला. दोन्ही वेळी शिवसेना आधीपेक्षा अधिक ताकदीनिशी पुढे आली होती याबाबतचे ट्विट त्यांनी केले होते. यानंतर आज त्यांनी शाह यांना जिव्हारी लागणारे ट्विट करून या विषयावरून पुन्हा उत्तर दिले आहे.

Protected Content