जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | २५ जून १९७५ हा भारतीय लोकशाहीतील एक काळा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी काँग्रेस सरकारने देशावर आणीबाणी लादून संविधानावर आघात केला होता. या घटनेला ५० वर्षं पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, संत झुलेलाल बहिणाबाई भाजप मंडळ क्र. २ च्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. प्रविणचंद्र जंगले यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले होते.
‘आणीबाणी लोकशाहीचे घटनात्मक अधिकार गोठविणारा काळा दिवस’ या विषयावर त्यांनी श्री सत्यवल्लभ हॉल, दिनानाथ वाडी येथे आपले विचार मांडले.
आणीबाणीच्या काळात न्यायसंस्था, प्रसारमाध्यमे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची गळचेपी झाली होती. सामान्य जनतेवर अन्याय झाला आणि हजारो निष्पापांना अनन्वित अत्याचार सहन करावे लागले. मात्र, या अंधाऱ्या काळातही हजारो देशभक्तांनी सत्याग्रह करत तुरुंगवास पत्करला आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष केला, असे अॅड. जंगले यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.
यावेळी आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या व्यक्तींचा आणि त्यांच्या वारसांचा सत्कार करण्यात आला. सतीश प्रभाकर मदाने, गजानन पन्नालाल जोशी, प्रदीप कृष्णदास गुजराथी, श्याम नारायण कलभंडे, गोविंदराव पारचोमल रामचंदाणी, देवीबाई सिखलदास रावलानी, वंदना शरद कुळकर्णी, आनंदा हरी पांचाळ, अॅड. श्रीकांत नारायण भुसारी आणि दत्तात्रय विष्णू देशपांडे यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते अॅड. प्रविणचंद्र जंगले यांच्यासोबत आमदार राजूमामा भोळे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ सूर्यवंशी उपस्थित होते. भाजप मंडळ २ च्या अध्यक्षा दीपमालाताई काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर अॅड. शुचिताताई हाडा यांनी सूत्रसंचालन केले. गोपाळ पोपटानी यांनी आभार प्रदर्शन केले.
माजी महापौर सिमाताई भोळे, ज्येष्ठ माजी नगरसेवक भगतभाऊ बालाणी, मनोज काळे, अमित काळे, रेखाताई वर्मा, सरोजताई पाठक, दिप्तीताई चिरमाडे, प्रकाश बालाणी, अॅड. विनय केसवानी, सुशील हसवानी, अविनाश नेहेते, स्वातीताई नेहेते, कांचनताई साने, नंदिनीताई राणा, चेतन तिवारी, सतीश पाटील, रवी पाटील, संजय अडकमोल, अविनाश भोळे, ऋषिकेश शिंपी, नीरज पाटील, हेमंत चौधरी, ललित लोकचंदानी, केदार देशपांडे, शाम करमचंदानी, सागर पोळ, रोहित वाघ आणि नंदिनी राणा यांचीही कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.