जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोलाणी मार्केटमधून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजय देवकरण सोनवणे वय २९ हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी २३ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अजय सोनवणे हा दुचाकी (एमएच १९ डीय ८९९६)ने शहरातील गोलाणी मार्केट परिसरात आला. दुचाकी पार्क करून खासगीकामासाठी निघून गेला. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी तरूणाची ४५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. अजयने परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू कुठेही आढळून आली नाही. अखेर बुधवारी २५ मे रोजी रात्री जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.