बीड येथील भीषण अपघातात ३ ठार; १५ जखमी

Accident

 

बीड वृत्तसंस्था । औरंगाबादकडून मुखेडकडे निघालेल्या एसटी बसची बोलेरो पिकअपला समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. धडक इतकी जोरात होती की, यात ३ जण ठार व १५ गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि.24) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास केज अंबाजोगाई जवळील चंदनसावरगाव रस्त्यावर घडलीय.

याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातीतल जखमींना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लोखंडी सावरगाव ते मांजरसुंबा दरम्यान मागील तीन वर्षात अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघात होत असल्याचे सांगण्यात येते. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले असून, यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content