वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्हाट्सअप ग्रुपवर धमकी ; पोलिसात तक्रार

whatsapp logo

 

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असलेल्या कनिष्ठ लिपिकाने त्यांच्याच कार्यालयातील सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या विरोधात व्हाट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकून, धमकी दिल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असलेले कनिष्ठ लिपिक नागेश गंगाधर पाटील याने 23 डिसेंबर रोजी रात्री 11.40 वाजता त्यांच्या ‘आरटीओ व्हाट्सअप ग्रुप’मध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांना बलात्काराच्या प्रकरणात फसवेल, तसेच कर वसुली अधिकारी सी. एस. इंगळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर अपलोड करून नावाचा उल्लेख केला. तसेच साक्षीदार यांना धमकावून ‘तुम सबको खतम करने के लिए मै अपने नोकरी छोड दुंगा’, अशी धमकी देखील व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून केली आहे.

दरम्यान, प्रादेशिक उपपरिवहन कार्यालयाचे अधीक्षक श्याम लोही यांनी कनिष्ठ लिपिक नागेश गंगाधर पाटील याच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकला प्रकरणाची तक्रार रामानंदनगर पोलिस स्टेशनला दिली आहे. याप्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही.

Protected Content