चोपडा शहरातून दोन दुचाक्या लांबविल्या; शहर पोलीसात गुन्हा

चोपडा प्रतिनिधी । शहरातील महाविर नगर आणि गंगाई नगर येथे अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी लांबविल्याची घटना सोमवारी उघडकीला आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील शेख लुकमान शेख सत्तार (वय-३९) रा. महावीर नगर यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीसी २७०९) आणि शहरातील गंगाई नगर परिसरातील रहिवाशी मनोहर जगन्नाथ पाटील (वय-५०) रा. गंगाई नगर चोपडा यांची (एमएच १९ डीसी ८७९०) या क्रमांकाच्या दुचाकी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्या. परिसरात शोधूनही मिळून न आल्याने दोघांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दोघांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील पोना संतोष पारधी आणि पो.ना. जयदीप राजपूत हे पुढील तपास करीत आहे.

Protected Content