भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भरधाव आयशरच्या जोरदार धडकेत तालुक्यातील बिलाखेड येथील तरूण जागीच ठार झाल्याची थरारक घटना आज दुपारी शहरातील मोठ्या पुलावर घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील बिलाखेड येथील विश्वनाथ विजय वाघ (वय-३२) हा आपल्या स्कुटीने जात असताना अचानक आयशरने (क्र. एम.एच.१८ बीजी १७९२) जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भिषण अपघातात विश्वनाथ विजय वाघ या तरूण चाकाखाली दाबला गेला. आणि जागीच त्याचा दुदैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी ‌घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व मृतदेहाला ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. सदर धक्कादायक घटना आज दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा भिषण अपघात घडल्याने चाळीसगाव तालुका हादरले आहे. तत्पूर्वी घटना घडताच आयशर वरील चालक पसार झाला आहे.

Protected Content