जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील साईराज हॉटेल समोरील महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिला रामदास पाटील रा. वाटीकाश्रम, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शिला पाटील या आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ टीएम ३३९९) ने विद्यापीठाकडून वाटीकाश्रम येथे घरी जात असतांना रस्त्यावरील साईराज हॉटेल समोरील महामार्गावर मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक (एमपी १६ टीई २८२९) ने जोरदार धडक दिली. या अपघात शिला पाटील या थोडक्यात बचावल्या असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी २ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता त्यांचे दिर राजेंद्र पाटील यांनी जळगाव तालुका पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ लिलाधर महाजन करीत आहे.