मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथे आज भाजपतर्फे भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यात नाथाभाऊ आणि रक्षाताईंसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुक्ताईनगर येथे भारतीय जनता पक्षा तर्फे आयोजित विजय संकल्प बाईक रॅली माजी महसुल मंत्री आमदार एकनाथराव खडसे व खासदार रक्षाताई खडसे सहभागी झाले. यासोबत जि. प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, विधानसभा विस्तारक विलास धायडे, भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, भाजप शहराध्यक्ष मनोज तळेले, सरचिटणीस संदीप देशमुख, जि. प. सदस्य निलेश पाटील, जयपाल बोडदे, वैशालीताई तायडे, पं स सदस्य विकास पाटील ,राजेंद्र सवळे, दत्ता पाटील, अंकुश चौधरी, पियुष मोरे, उपगट नेते संतोष कोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.