जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपने जळगावातून स्मिता वाघ तर रावेरातून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपचे आज यादी जाहीर केली असून २० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात जळगावातून स्मिता वाघ तर रावेरातून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव आणि रावेरमधून नेमके कुणाला तिकिट मिळणार याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. यात जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकिट कट झाले असून त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाली आहे. तर रावेरमधून मात्र रक्षा खडसे यांना तिसर्यांदा पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे.
गेल्या निवडणुकीत स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या आधी त्यांचे तिकिट कापून तेव्हा आमदार असणारे उन्मेष पाटील यांना तिकिट देण्यात आले होते. या माध्यमातून भाजपमधील अंतर्गत कलह देखील उफाळून आला होता. आता मात्र त्यांना उमेदवारी देऊन पक्षाने एका प्रकारे त्यांना मोठा दिलासा दिला आहे.