भाजपने जाहीर केली लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने यादीमध्ये १९६ उमेवारांची नावे जाहीर केली आहे.

यामधील महाराष्ट्रातील वीस जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. नंदुरबारमधून डॉ. हिना गावित, धुळ्यातून सुभाष भामरे, जळगावमधून स्मिता वाघ, रावेतमधून रक्षा खडसे, अकोल्यातून अनूप धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रतापराव चिखलिकर, जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्या नावाचा समावेश आहे. डिंडोरीतून भारती पवार, भिवंडीतून कपिल मोरेश्वर पाटील, मुंबई उत्तरमधून पियूष गोयल, मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, बीडमधून पंकजा मुंडे, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर श्रृंगारे, माढ्यातून रणजीतसिंह निंबाळकर, सांगलीतून संजयकाका पाटील यांचा या यादीत समावेश आहे.

शक्यतेप्रमाणे भाजपने महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना पुन्हा संधी दिली आहे, तर पंकजा मुंडे, स्मिता वाघ, मुरलीधर मोहोळ यां नव्या उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.

Protected Content