जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा येथील ईधासी मातेच्या यात्रोत्सवात जुगार खेळणाऱ्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी घडल्याची घटना रविवारी १५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी जामनेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून धडपकड करण्यास सुरूवात केली आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर शहरापासून जवळ असलेल्या केकतनिंभोरा येथी ईधासी मातेच्या मंदीर परिसरात मकरसंक्रात दिनाच्या पर्श्वभूमीवर यात्रोत्सवाचे आयोजन रविवारी १५ जानेवारी रोजी करण्यात आले. या यात्रोत्सवात संक्रातीच्या यात्रोत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली. यात महिला, पुरूष, अबालवृध्द आणि मुलांचा सहभाग होता. यात्रोत्सवाच्या बाजच्या ठिकाण मोठ्या प्रमाणावर जुगाराचे खेळ सुरू होते. दरम्यान, दुपारी ४ वाजेच्या सुमारास यात्रोत्सवात जुगार खेळण्याच्या कारणावरून दोन गटातुफान हाणामारी करण्यात आली. यावेळी यात्रोत्सवात तैनात असलेले जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून गर्दी करणाऱ्यांना पांगवापांगव केली. पोलीसांच्या मध्यस्थीने पुढील अनर्थ टळला आहे. यात्रोत्सवाच्या ठिकाणी जुगार बंदच केला पाहिजे अशी मागणी भाविक व यात्रेकरून यांच्याकडून केली जात आहे.