कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हाट्सअपच्या सेटिंग बदलल्याने ग्रुप ही झाले शांत

जामनेर, प्रतिनिधी । सोशल मीडियाचा वापर सध्या सर्वत्र जोरात होत असतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हाट्सअपचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यात चांगले वाईट मेसेज पाठवण्याचे काम सर्वच मंडळी करत होती. यावर नियंत्रण आणण्यासाठी खोटी व चुकीची माहिती देणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत असल्याच्या बातम्या येऊन धडकत असल्याने कोताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता येथील जळपास सर्वच ग्रुप ऍडमीन यांनी व्हाट्सअप च्या सेटिंगमध्ये बदल करून ओन्ली ऍडमीन हे ऑप्शन सुरु केले आहे.

जातीय द्वेष पसरवणे, कधी कोरोना संदर्भात खोटी माहिती पसरवणे असे प्रकार घडत होते. शासनाने त्यावर निर्बंध आणून व्हाट्सअप सेटिंगमध्ये बदल करून फक्त आता एकाच व्यक्तीला एका वेळेस मेसेज पाठवता येतो किंवा एका ग्रुपवर एका वेळेला एकच मेसेज पाठवता येतो. तसेच बहुतेक ग्रुप ऍडमिन यांनी सेटिंगमध्ये चेंज करून फक्त ऍडमीन मेसेज पाठवू शकतो असे सेटिंग करून घेतल्याने सर्व ग्रुप असे शांत शांत झाले आहेत. दिवसभरातून येणाऱ्या हजारो मेसेज आता कमी झाले असून त्यांची संख्या अत्यल्प झाली आहे. यामुळे व्हाट्सअप देखील आता शांत झाल्याने अनेकांना शांत वाटत असून एकच मेसेज सर्व ग्रुपवर फिरायचा ते बंद झाल्याने डोकेदुखी सुद्धा काही प्रमाणात कमी झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

Protected Content