मोठी बातमी ! राज्यसेवा पूर्व परिक्षेच्या तारखेत बदल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. 6 जुलै रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा आता 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. ज्या आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेच्या तारखेमध्येही बदल करण्यात आला आहे. या संबंधित निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता दिनांक ०८ मे, २०२४ च्या शुद्धिपत्रकानुसार एकूण ५२४ रिक्त पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करण्यात आला असून अराखीवअथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.

Protected Content