बदलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला केला आहे. त्याला ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन जात असताना ही घटना घडली. यावेळी अक्षयने पोलीसांजवळील बंदूक हिसकावरून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमने आज अक्षयला तळोजा जेलमधून ताब्यात घेतले होते. तसेच त्याला दुपारच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी करण्याकरीता घेऊन जात होते. यावेळी मुंबई बायपासजवळ पोहोचताच अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकली. तसेच पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्याच्या दिशेने गोळीबार केला. यात अक्षय जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.