राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारकांमध्ये उमेश नेमाडे यांची समावेश

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांची पक्षातर्फे निवडणूक प्रचारकांमध्ये नियुक्ती केली आहे.

या महिन्याच्या अखेरीस राज्यातील नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. दरम्यान, याच यादीसोबत पक्षाने फर्डे वक्ते असणार्‍या आठ पदाधिकार्‍यांची स्वतंत्र यादी जाहीर केली असून त्यांच्यावर निवडणूक प्रचारक म्हणून जबाबदारी टाकण्यात आलेली आहे.

या आठ मान्यवरांच्या यादीत भुसावळचे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांचा देखील समावेश आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी आज त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या अनुषंगाने श्री नेमाडे आता निवडणुकीच्या प्रचारात वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.

या अतिशय सन्मानाच्या मानल्या जाणार्‍या यादीत उमेश नेमाडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!