मुक्ताईनगर विदयालयात इयत्ता चवथी पर्यंतचे वर्ग सुरु

मुक्ताईनगर प्रतिनिधी | सौ.तु.ल.कोळंबे प्राथमिक विदयामंदीर, मुक्ताईनगर येथे शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार इयत्ता चवथी पर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत.

दि.1 डिसेंबरपासून इ.1 ली. ते. 4 थी चे वर्ग सुरू केले त्यामुळे जवळपास पावणेदोन वर्षानंतर प्रथमच विद्यार्थ्यांना आज शाळेत यायला मिळाले त्यामुळे विद्यार्थी व पालकात उत्सुकता होती. शाळेच्या प्रवेशद्वाजवळ रांगोळी काढली होती. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक मोतीलाल जोगी व शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

आज पहिल्या दिवशी एकूण पटसंख्येपैकी 36 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मास्क लावले होते. शाळेच्या गेटवरच सँनिटायझर स्टँड लावलेले आहे. स्कूल कमेटी चेअरमन पुरुषोत्तम महाजन यांनी शाळेत भेट देऊन पाहणी केली. काल संपूर्ण वर्ग खोल्या, शाळा परिसर स्वच्छ करून सँनिटाईज करण्यात आल्या. “गर्दी टाळण्यासाठी व कोविडचे नियम पाळण्यासाठी शाळा दोन शिफ्टमधे भरविण्यात येत आहे…” असे मुख्याध्यापक मोतीलाल जोगी यांनी सांगितले.

Protected Content