गावठी कट्टयासह दोन तरूणांना अटक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गावठी कट्टा बाळगून याच्या जोरावर दहशत पसरवणार्‍या दोन तरूणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, भुसावळ शहरात अनेकदा गावठी कट्टे आढळून येत असतात. मध्यंतरी पोलीस प्रशासनाने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे याला बर्‍याच प्रमाणात पायबंद बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, गावठी कट्टा घेऊन दोन तरूण दहशत माजवत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या अनुषंगाने एलसीबी आणि बाजारपेठ पोलीस स्थानकांनी संयुक्त कारवाई करून या दोघांना ताब्यात घेतले.

या कारवाईमध्ये अक्षय प्रताप न्हावकर उर्फ थापा (वय २४, चक्रधर नगर, भुसावळ) व ऋतिक नरेश चौधरी (वय २३, पंचशील नगर, भुसावळ) या दोघांना अटक केली असून नीलेश चंद्रकांत ठाकूर हा मात्र पलायन करण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: