भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देश्यीय संस्थेतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
भुसावळच्या छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंती निमित्त १४ ते २१ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. . शिवजयंती घराघरात साजरी करताना शिवचरित्र सांगताना त्यांचा वैचारिक वसा समाजमनामध्ये रुजावा व जोपासला जावा या उद्देशाने महाराष्ट्रातील विद्वान व्याख्याते शिवचरित्राचे नानाविध पैलू उलगडून दाखवणार आहेत. डॉ. जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
व्याख्यानमालेचे उद्घाटन पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, डायटचे अधिव्याख्याता शैलेश पाटील यांच्या हस्ते होईल. शिवजयंती घराघरात साजरी करताना शिवचरित्र सांगताना त्यांचा वैचारिक वसा समाजमनामध्ये रुजावा व जोपासला जावा या उद्देशाने महाराष्ट्रातील विद्वान व्याख्याते शिवचरित्राचे नानाविध पैलू उलगडून दाखवणार आहेत. डॉ. जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
१४ रोजी प्रा. डॉ. गजानन महाराज वाव्हळ (पुणे) यांचे ‘तुकोबाराय आणि शिवराय’ या विषयावर व्याख्यान होईल. १५ रोजी युवा शिवशाहीर अक्षय डोंगरे (नगर) यांचा शाहिरी पोवाडा गायन, १६ रोजी शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे (जळगाव) यांचे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ समजून घेताना या विषयावर व्याख्यान होईल. १७ रोजी शिवचरित्रकार चंदन पवार (जळगाव) यांचे शिवरायांची युद्धनीती, १८ रोजी गंगाधर महाराज कुरुंदकर (हिंगोली) यांचे शिवरायांचा महिलाविषयक दृष्टिकोन, १९ रोजी डॉ. स्वप्नील छाया विलास चौधरी (औरंगाबाद) यांचे शिवछत्रपतींचा विचार हीच काळाची गरज, २० रोजी शिवचरित्रकार प्रेमचंद अहिरराव (धुळे) यांचे स्वराज्याचा राज्यकारभार : लोकशाहीचा आधार या विषयावर व्याख्यान होईल. समारोपीय व्याख्यान २१ रोजी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे होणार असून ‘स्वराज्य आणि धर्म’ या विषयावर ते संवाद साधतील.