Home क्राईम भुसावळ तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल

भुसावळ तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल

0
157

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी १३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय पिडीत मुलगी ही वास्तव्याला आहे. शुक्रवारी १३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. हा प्रकार समोर अल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतू तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. अखेर याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी हे करीत आहे.


Protected Content

Play sound