भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील रेल्वे स्थानकावरून देशी आणि विदेशी मद्यासह तंबाकूजन्स पदार्थांचा साठा जप्त करण्याची कारवाई आज करण्यात आली.
भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर १/२ वर असलेल्या स्टॉल वर रेल्वे सुरक्षा बलाने शनिवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास छापा टाकून देशी विदेशी दारू व तंबाखूजन्य पदार्थ केले जप्त केला आहे.
रेल्वे स्थानकावरील स्टॉल वर देशी विदेशी दारू विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. यावरून लोहमार्ग पोलिसांनी प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन वरून स्टॉल वर छापा टाकून देशी विदेशी दारू व तंबाखूजन्य पदार्था जप्त केली आहेत.
दरम्यान या कारवाईमध्ये १० देशी दारूच्या बॉटल , ८ विदेशी दारूच्या बॉटल, ४ सिगारेट चे पाकीट २ बिडी चे पाकीट व ४ गुटख्याचे पॅक रेल्वे सुरक्षा बलाने जप्त केल्याची माहिती सिनियर डीसीएम शिवराज मनसपुरे यांनी दिली आहे.
घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने पंचनामा सुरू असून संबंधीत कार्यवाही सिनियर डी सी एम शिवराज मनसपुरे, कमर्शियल इनिस्पॅक्टर नितीन राठोड , कमर्शियल स्टेशन मॅनेजर मिलिंद साळुंखे, टीटीई श्री. धरणगावकर , हेल्थ इन्स्पेक्टर श्री धर्मवीर, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक श्री मीणा यांच्या पथकाने केली आहे.