रेल्वे विभागीय समितीच्या सदस्यपदी परीक्षित बर्‍हाटे

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ रेल्वेच्या झेडआरयूसीसी म्हणजेच क्षेत्रिय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यपदी भाजपचे शहराध्यक्ष नगरसेवक परीक्षित बर्‍हाटे यांची निवड करण्यात आली आहे.

भुसावळ येथील डीआरएम कार्यालयात मंगळवारी रेल्वे सल्लागार समितीची प्रत्यक्ष बैठक पार पडली. त्यात विभागीय रेल्वे सल्लागार (डीआरयूसीसी) समितीच्या ३६ सदस्यांमधूनच एकाची मुंबई येथील झेडआरयूसीसी सदस्यपदी निवडीची प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये विनायक पाटील, संजय पवार, महेंद्र बुरड (मलकापूर) आणि परीक्षित बर्‍हाटे (भुसावळ) असे चौघे उमेदवार होते. दुपारी १२.३० वाजता मतदान प्रक्रिया सुरू होताच पाटील व पवार यांनी माघार घेतली. यानंतर १ वाजेपर्यंत मतदार प्रक्रिया राबवली गेली. त्यात बर्‍हाटे व बुरड हे दोघे रिंगणात उरले. त्यात बर्‍हाटे यांना १७, तर बुरड यांना ९ मते मिळाली. डीआरएम तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.केडिया यांनी परीक्षित बर्‍हाटे हे विजयी झाल्याचे घोषित केले.

परीक्षित बर्‍हाटे यांची निवड जाहीर होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत असून समाजाच्या विविध स्तरांमधील मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे. तर, रेल्वे प्रवाशांच्या सुविधांसाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!