शांतता भंग करणार्‍यांवर कारवाई

भुसावळ प्रतिनिधी । आरडा-ओरड करून शांततेचा भंग करणार्‍यांविरूध्द बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे.

शहराच्या काही भागांमध्ये अंधार पडल्यानंतर काही टारगट तरूण गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मोकळ्या जागांमध्ये धिंगामस्ती, आरडाओरड करून शांतता भंग करणे, दारू पिऊन वाद घालणार्‍यांविरूद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अनुषंगाने काल रात्री १० जणांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील खडका रोड, दिनदयाल नगरसह अन्य भागात मोकळ्या जागांवर एकत्र येऊन दारू पिणे, घोळक्याने थांबून धिंगाणा घातला जातो. अशा उपद्रवींवर बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी रात्री कारवाई केली.

या कारवाईक गजानन पवार, प्रमोद पाटील, शेख इब्राहिम शेख कासम, समाधान सपकाळे, विजय निंबाळकर, प्रदीप पाटील, राजेंद्र इंगळे, अमोल कोळी, इब्राहिम शेख यांना ताब्यात घेत कारवाईशीर कारवाई झाली. यानंतर समज देऊन त्यांना सोडण्यात आले.

Protected Content