भुसावळ नगरपालिका दोन दिवसांसाठी बंद

भुसावळ प्रतिनिधी । येथील नगराध्यक्ष रमण भोळे हे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे भुसावळ नगरपालिकेचे काम आपत्कालीन सेवा वगळता दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, काल सायंकाळीच नगराध्यक्ष रमण भोळे यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांनी याबाबत स्वतःहून माहिती जाहीर करत आपल्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तपासणी करून काळजी घ्यावी, असे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर भुसावळ नगरपालिकेचे काम आपत्कालीन सेवा वगळता आजपासून दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. या अनुषंगाने आज आणि उद्या भुसावळ नगरपालिकेचे काम बंद राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

Protected Content