राष्ट्रीय शिक्षा नीती विरोधी आंदोलन समन्वय समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने नुकतेच राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० जाहिर केले असून त्या धोरणाविरोधात भारतीय समाज अंधकाराच्या खाईत लोटला जात असल्याने राष्ट्रीय शिक्षा नीती विरोधी आंदोलन समन्वय समिती जळगाव कमिटीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी ११ वाजता आंदोलन केले व विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारींना दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकतेच केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० जाहिर केले असून त्या धोरणामुळे भारतीय समाज समाज अंधकाराच्या खाईत लोटला जाणार आहे, इयत्ता ६वी पासून कौशल्याचे प्रशिक्षण देणाऱ्‍या या धोरणामुळे सुताराचा मुलगा सुतार, कुंभाराचा मुलगा कुंभार बनविण्याचे मोठे षडयंत्र यात आहे, असे अनेक छुपे कटकारस्थान या धोरणात आहे, या धोरणाचा निषेध करण्यासाठी देशव्यापी जनआंदोलन उभे झाले आहे , त्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजे जिल्हाधिकाऱ्‍यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात येत आहे.

यावेळी मुकुंद सपकाळे, अमोल कोल्हे, प्रा. संजीव साळवे, प्रा.डॉ. सत्यजित साळवे, श्रीकांत मोरे, संजय तांबे, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, दिलीप सपकाळे, फहिम पटले, चंदन बिऱ्हाडे, रमेश सोनवणे, माधव पाटील, मुकेश पाटील, भैय्या पाटील, राहूल नेवे, डॉ. प्रकाश कांबळे आंदोलनात सहभागी होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/601797047392032/

Protected Content