भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील महिलेचे कपडे बदलत असतांना चोरून चित्रीकरण करणार्याला अटक करण्यात आली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरातील एका विवाहित महिलेचे चोरून चित्रीकरण करण्यात येत असल्याची घटना घडली आहे. संबंधीत महिला ही आंघोळीनंतर कपडे बदलत असतांना एक जण आपले चोरून चित्रीकरण करत असल्याचे तिला जाणवले. तिने लागलीच आपल्या पतीला याची माहिती दिली. पतीने संबंधीत व्यक्ती हा प्रतिक जीवन शिंगारे (वय ३४) असून तो पळून जात असल्याचे पाहिले.
दरम्यान, संबंधीत महिलेने शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. यावरून प्रतीक जीवन शिंगरे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय दिलीप चौधरी हे करत आहेत.