ऑक्सीजनसाठी दात्यांचे उभे राहिले नेटवर्क : डॉ. नि. तु. पाटलांचा समन्वय

भुसावळ प्रतिनिधी । ऑक्सीजन मिळत नाही म्हणून प्रशासनाला शिव्याशाप देण्यापेक्षा लोक सहभागातून प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी डॉ. नि. तु. पाटील यांनी सुरू केलेली चळवळ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली असून आज न्हावी येथील कोविड केअर सेंटरमध्ये साठा संपण्याच्या मार्गावर असतांना वेळीच मदत मिळाल्याने रूग्णांचे प्राण वाचले आहेत.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

याबाबत वृत्त असे की, कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने प्राणवायूचा पुरवठा कमी होऊ लागला आहे. यातच प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक ठिकाणी वेळेवर ऑक्सीजन पोहचत नसल्याने अनंत अडचणी उभ्या राहत असल्याचे दिसून येत आहे. याच प्रकारे भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा बंद झाल्यानंतर भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक डॉ. नि. तु. पाटील यांनी स्वखर्चाने प्राणवायूचा पुरवठा करून रूग्णांचे प्राण वाचविले. मात्र प्रशासनाला घाम फुटला नाही व ठेकेदाराचे बील प्रदान करण्यात आले नाही. यामुळे नाऊमेद न होता डॉ. पाटील यांनी भुसावळच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी लोकसहभागाचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले. याला प्रतिसाद देत अनेक दाते समोर आले.

यात भुसावळच नव्हे तर ठिकठिकाणाहून मदत येऊ लागली. यानंतर तर थेट कॅनडातून ऑक्सीजन सिलेंडरसाठी मदत आहे. हे सारे होत असतांना आज न्हावी येथील कोविड केअर सेंटरमधील ऑक्सीजन संपण्याच्या मार्गावर असतांना डॉ. नि. तु. पाटील मदतीला धावून गेले. त्यांनी एका दात्याने केलेल्या मदतीमुळे तेथे ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा केला.

याबाबत डॉ. नि. तु. पाटील यांनी सोशल मीडियात शेअर केलेली पोस्ट ही आपल्यासाठी जशीच्या तशी सादर करत आहोत.

आज सकाळी माझा विद्यार्थी तथा मेडिकल ऑफिसर, डॉ. प्रसाद पाटील,ग्रामीण रुग्णालयात न्हावी,ता यावल यांच्याशी वार्तालाप करतांना त्यांनी सांगितले,
सर, आमच्या ग्रामीण रुग्णालयात पण ऑक्सिजन सिलेंडर चा फारच तुटवडा जाणवतो. दिवसाला आम्हाला 25 ते 30 सिलेंडर लागतात,पण मिळतात,5 ते 10,फार तारांबळ उडते,रुग्णांची काळजी वाटते,प्रशासन प्रयत्न करते पण आमची मागणी पूर्ण नाही होत…! आता 2 ऑक्सिजन सिलेंडर बाकी आहे फक्त,12 वाजेपर्यंत पुरतील..!

त्यांना म्हटले,काहीही काळजी करू नको,12 वाजेच्या आत 10 जंबो ऑक्सिजन सिलेंडर ग्रामीण रुग्णालयात असतील…!

आपल्याकडे आता आपण आवाहन केल्याने यादीच तयार आहे, त्यातील मनोज सरोदे हल्ली निवास पुणे येथे असून मूळ रहिवासी नारायण नगर,भुसावळ यांच्याही बोलून लगेच त्यांनी 10 जंबो ऑक्सिजन सिलेंडर देण्याची तयारी दाखवली आणि मग लगेच पुढची वाटचाल लावत ऑक्सिजन सिलेंडर ग्रामीण रुग्णालय, न्हावी, ता. यावल जि. जळगाव याठिकाणी पोहचते केले.

मनोज सरोदे यांचे लाख लाख धन्यवाद…!

सर्व मीच करेल,यापेक्षा सर्वांनी थोडा,थोडा खारीचा वाटा जर उचलला, तर नक्कीच करोना रुपी राक्षसासोबत लढणे सोप जाईल,नागरिकांचे सामाजिक भान जागृत होईल आणि प्रशासनाला पण मदत होईल..!
आता आपले कार्य हे मागणी,पुरवठादार आणि दानशूर व्यक्ती यांच्यातील फक्त समन्वयाची आहे…!

डॉ. नि. तु. पाटील, 8955595999
उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक ,
वैद्यकीय आघाडी,भारतीय जनता पार्टी ,
महाराष्ट्र राज्य,

Protected Content