ताप्ती पब्लीक स्कूलतर्फे पूरग्रस्तांना मदत

tapti school madat

भुसावळ प्रतिनिधी । येथील ताप्ती पब्लीक स्कूलतर्फे नुकतीच पूरग्रस्तांसाठी मदत रवाना करण्यात आली.

सातारा, सांगली व कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामुळे मोठे नुकसाद झाले आहे. या अनुषंगाने तेथील पूरग्रस्तांसाठी लागणार्‍या ब्लँकेट, कपडे,बूट,बिस्केट, गहू, तांदूळ, तेल, साखर,चहा पत्ती तसेच औषधी अशा जीवनावश्यक वस्तू व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका, शिक्षक,शिक्षेकतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांनी जमा केली. यानंतर हा ट्रक रवाना करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्या नीना कटलर यांची उपस्थिती होती.

Protected Content