भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती समारोह कार्यक्रमा अंतर्गत भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर उत्तर- दक्षिण मंडळ तर्फे सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत भुसावळ शहरातील डॉ.श्यामाप्रसाद उद्यानातील नर्मदेश्वर महादेव मंदिर व परिसराची साफसफाई करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना वंदन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणा दिल्या. तसेच नामदार संजय सावकारे व पदाधिकारी यांच्या हस्ते मंदिरात महाआरती करण्यात आली. यानंतर परिसराची साफसफाई करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव अजय भोळे, उत्तर विभाग मंडळ अध्यक्ष संदीप सुरवाडे तसेच दक्षिण विभाग मंडळ अध्यक्ष किरण कोलते यांच्या यांच्यासह माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे राजेंद्र नाटकर, जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे, प्रवीण इखणकर, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी,माजी नगरसेवक निर्मल कोठारी, पुरुषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन, ललित मराठे, राजू खरारे, शंकर शेळके, रवींद्र ढगे, राहुल तायडे, प्रशांत पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष अनिता आंबेकर, अलका शेळके, शैलेजा पाटील, पल्लवी वारके, प्रमोद पाटील, अमोल पाटील, निलेश पाटील, अमित असोदेकर,अमोल झटकार, सागर चौधरी,सागर वाघोदे, रवींद्र खरात, रवींद्र दाभाडे,संतोष ठोकळ, गोपी राजपूत, करण पन्सारी आदींची उपस्थिती होती.