भुसावळ प्रतिनिधी । सध्या चित्रपटगृह हा व्यवसाय डबघाईला आलेला असुन विजय चौधरी यांनी धाडसाने स्टार सिनेमागृह सुरू केले आहे. या थिएटरचे विशिष्ट असे की, कुटुंबाने एकत्रित बसून चविष्ट भोजनाचा अस्वाद घेतांना चित्रपट पाहु शकतात. ही सुविधा महाराष्ट्रातील एकमेव ‘स्टार सिनेमा’ थिएटरमध्ये असल्याचे आ. खडसे यांनी सांगितले आहे.
खडसे यांच्या हस्ते या थिएटरचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी सर्व नगरसेवक पदाधिकारी यांचे चौधरी परिवारातर्फे स्वागत करण्यात आले. आमदार सावकारे म्हणाले, की अत्यंत कष्टातून विजय चौधरी यांनी हे वैभव उभं केले आहे. यामुळे शहराच्या लौकिकात भर पडली आहे. प्रसंगी ईश्र्वरलाल जैन यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. यावेळी सर्व नेत्यांनी चित्रपटाचा आनंद घेतला आहे. तसेच पुढारी नेत्यांची दिनक्रम अत्यंत व्यस्त असा असतो. ते त्यांच्या कुटुंबालाच काय स्वतःला देखील वेळ देऊ शकत नाही. विरंगुळा तर दूरच त्यातही अनेक वर्ष झाले तरी चित्रपटगृहाचे तोंडही पाहिले नाही. मात्र विजय चौधरींच्या या स्टार सिनेमा उद्घाटनाच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांनी काही वेळ का होईना चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार ईश्र्वरलाल जैन, आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे तसेच यावेळी प्रा.डॉ. सुनील नेवे, हाजी मुन्ना तेली, सुधाकर जावळे, प्रमोद सावकारे, पुरुषोत्तम जावळे, संतोष चौधरी (दाढी), राजेश पाटील, राजेश वानखेडे, गिरीष महाजन, अॅड.बोधराज चौधरी, महेंद्रसिंग ठाकूर, रवींद्र सपकाळे, अमोल इंगळे, गोलू पाटील, मुकेश गुंजाळ, शीतल साळी, सुनील बढे, अभय रावते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.