भुसावळमध्ये सराईत हद्दपार गुन्हेगाराला अटक

241c9d21 d6c6 4b01 938e 132a3e647eaf

 

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातून हद्दपार असलेला सराईत गुन्हेगाराला भुसावळात विना परवानगी आल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीवरून बाजारपेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, भुसावळ बाजार पेठ हद्दीतील निखील सुरेश राजपुत (वय -26, रा. दत्त नगर) याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहे. तसेच तो हिस्ट्रीशीटर गुन्हेगार सुध्दा आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्याला हद्द्दपार करण्यात आलेले आहे. निखील हा भुसावळमध्ये आल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक देविदास पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पो.हे.काँ रविंद्र साळुखे पो.ना.नरेंद्र चौधरी, रमण सुरळकर पो.काँ कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, प्रशांत लाड यांच्या पथकाला माहिती दिली. त्यानुसार गस्तीवर असतांना शहरातील नाहाटा चौफुलीजवळ निखीलला ताब्यात घेतली. त्याच्यावर भाग 6 गु.र.न 413/2019 म.पो.का.क.142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.रमण सुरळकर करीत आहे .

Protected Content