जळगाव, प्रतिनिधी | भाऊसाहेब राऊत विद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त विद्यालयातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.आर.कोळी होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, महापालिकेचे क्रीडाधिकारी चंद्रकांत वांद्रे,पर्यवेक्षक एल. एस .तायडे, वंदना बलसाने, शशिकांत रायसिंग, अरुणकुमार बाविस्कर यांची उपस्थिती होती. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांनी केले. मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा कारकीर्द विषयी राजेश जाधव यांनी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी विद्यालयाचे लिपिक तथा कबड्डी खेळाडू विशाल सोनवणे विद्यालयाचे राज्य खेळाडू पवन कांडेलकर, धिरज कोळी, हर्षल सोनवणे, प्रथम बाविस्कर, भोजराज पवार, गणेश राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. आभार सुवर्णसिंग राजपूत यांनी मानले.