प्रलंबित ‘पीर मुसा कादरी बाबा कब्रस्थान जागेवर’ तार कंपाऊंड कामाचे भूमिपूजन

चाळीसगाव प्रतिनिधी | गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित ‘पीर मुसा कादरी बाबा कब्रस्थान जागेवर’ आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते तार कंपाऊंड कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला.

“आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून स्वखर्चाने होत असलेल्या कामाच्या भूमिपूजनास मुस्लिम समाज ट्रस्ट अध्यक्ष गफूर हाजी पेहलवान, माजी नगरसेवक चिराग शेख, फकिरा बेग मिर्झा, इंद्रिस दादा मुजावर, ट्रस्टी रेहमान मामु शेख, ट्रस्ट सेक्रेटरी अनवर शेख, ट्रस्टी लुकमान बेग, ट्रस्टी हाफिज ड्रायव्हर, ट्रस्टी जावेद कागजी, ट्रस्टी जाकीर शेख, ट्रस्टी शाकिर भाई, इम्रान मेम्बर, कैसर खाटीक, अकिल मेम्बर, असगर भाई सैय्यद, पंचायत समिती गटनेते संजू पाटील, नगरसेवक नितीन पाटील, सोमसिंग राजपूत, सदानंद चौधरी, भास्कर पाटील, बापू अहिरे, चंदू तायडे, संगीता गवळी, बबन पवार, प्रभाकर चौधरीं, मंजूर हाजी, विजय जाधव, संभाजी जाधव, वसीम चेअरमन, आरिफ सैय्यद, अलाउद्दीन दादा, अखलाक खाटीक, अमोल चौधरी, बिलाल काकर, सैय्यफ सलीम, लुकमान शाह, प्रदीप राजपूत, बंडू पगार, हुसेन भाई अग्रवाल, मुराद पटेल, तन्वीर भाई, अस्लम मिर्झा, इर्फान कुरेशी, समीर शेख, छोटा इकबाल कुरेशी, छोटा व्यापारी, छोटू पहेलवान, सुमित भोसले यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अफसर खाटीक यांनी केले. अॅड.कैलास आगोणे यांनी या कामासाठी वाळू देणार तर बारकू नाना जाधव यांनी खडी देण्याचे जाहीर केले. आमदार मंगेश चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक वर्षांनंतर गट तट विसरून मुस्लिम समाज कब्रस्थान जागा निमित्ताने एकत्र आलेला पाहायला मिळाला.

सत्काराला उत्तर देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी मनोगतात, “सदर जागेबाबत न्यायालयात दावा सुरू असला तरी समाजाच्या हक्काच्या जागेसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची माझी तयारी आहे. मात्र हे सर्व करत असतांना सर्वांनी जागेच्या जवळ असणारी थोडीफार अतिक्रमणे यांचा सहानुभूतीने विचार करून निर्णय घ्यावा तसेच कब्रस्थान कामांमुळे आजूबाजूला त्रास होणार नाही यादृष्टीने नियोजन करावे.” असे आवाहन मंगेश चव्हाण यांनी केले.

यावेळी माजी नगरसेवक चिराग शेख मेम्बर आणि मुस्लिम समाज अध्यक्ष हाजी गफार पेहलवान आणि अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “ज्यांचा या जागेवर रहिवास होता त्यांचादेखील समाज सहानुभूतीपूर्वक विचार करेल व सदर जागेवर दफनविधीसाठी १० लोंकांची समिती बनवून नियोजनबद्ध रीतीने दफनविधी केले जातील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

Protected Content