पिंपळे बु॥ येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळे बु॥ येथे १५ लक्ष निधीतून मंजूर झालेल्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आ.अनिल पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

2515 योजनेतून हे काम मंजूर झाले आहे.यावेळी आमदारांचे उस्फूर्त असे स्वागत ग्रामस्थांनी केले,यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की कोरोनामुळे सुमारे दीड ते दोन वर्षे निधीअभावी काही विकासकामे रखडली असली तरी आता निधीचा वेग वाढवून बॅकलॉग भरून काढण्याचे काम सुरू आहे. यास सर्वांच्या आशीर्वादाने यश देखील मिळत आहे, या गावाने मला विशेष प्रेम दिले असल्याने येणाऱ्या काळात आवश्यक ती सर्व विकासकामे मार्गी लावली जातील अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली.

यावेळी शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पाटील, सरपंच इंदुबाई पाटील, माजी सरपंच योगेश पाटील, पोलीस पाटील, दिलीप पाटील, ग्रा. प. सदस्य देविदास चव्हाण, विकासो चेअरमन अशोक पाटील, महेंद्र पाटील, विश्वास पाटील, राहुल पाटील, निंबा पाटील, दिलीप बैसाणे, युवराज सैदाणे, प्रकाश पाटील, डिगंबर चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, ऋषिकेश पाटील, जिवन पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन युवराज सोनवणे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content